दिशा, स्पंदन ही सुरुवातीच्या लिखाणाची प्रतिबिंबे. दूर रानभर विस्कटलेल्या शब्दांना एकत्रित करून एका साचेबंधात गोळा करण्याची अल्लड धडपड. सुरुवातीच्या लेखनातील साधेपणावर गहिवरतेचा साज चढू लागतो आणि जीवनातील सुखाइतकेच दु:खावरही प्रेम करण्याची उदात्त भावना जन्म घेते. उभरत्या दिवसांतील साधेपण आणि नकळत्या जाणीवांना अलवार शब्दांमध्ये गुंफण्याचा निरागस प्रयत्न.